भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
नवी दिल्ली - जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा आरोग्याचे कारण देत अचानक दिला होता. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लागली होती. आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. या निवडणुकीत उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना ४५२ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन्ही आघाड्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आज कालपासून सुरू झालेले मतदान सायंकाळी पाच वाजता संपले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९८ टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे. मतमोजणीला आज संध्याकाळी ६ वाजता सुरुवात झाली. राज्यसभेचे सरचिटणीस आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी यांच्या देखरेखीखाली नवीन संसद भवनात मतमोजणी करण्यात आली.
यामध्ये १४ खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे समजते तर 14 खासदार मतदानापासून दूर राहिले आहेत. या निवडणुकीत १५ मते अवैद्य म्हणून घोषित करण्यात आली आहेत.




