मराठा सेवा संघ कोल्हापूर तर्फे रुईकर कॉलनी येथे छ.संभाजी महाराज जयंती साजरी

मराठा सेवा संघ कोल्हापूर तर्फे रुईकर कॉलनी येथे छ.संभाजी महाराज जयंती साजरी

​कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज मराठा सेवा संघ कोल्हापूर तर्फे  रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

​यावेळी भागातील नागरिक आणि शिवशंभु भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'छत्रपती संभाजी महाराज की जय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शंभूराजांच्या पराक्रमाची गाथा आणि त्यांचे स्वराज्यासाठीचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी मराठा सेवा संघांचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे यांनी व्यक्त केल्या, यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष निलेश चव्हाण,नितीन शेटके, इमरान तासगावकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील, त्वरिता पाटील,दीपाताई कोकाटे, सुमन वागळे आदी उपस्थित होते.