महापालिका निवडणूक माध्यम कक्ष बागल मार्केटमध्ये स्थलांतरीत
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26 च्या अनुषंगाने माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती माध्यम कक्ष (मिडीया कक्ष) स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाचे व्हि.टी.पाटील सभागृह येथील कार्यालय कामकाजाच्या सोईस्तव राजारामपूरी बागल मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर नगररचना ऑफिसमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती माध्यम कक्ष या कार्यालयाकडे निवडणूकीसंदर्भातील जाहिरात प्रमाणन, सोशल मिडीया इत्यादी कामकाज सुरु आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




