मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासात देशात आघाडीवर–राजे समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान, अभ्यासू, निर्णयक्षम आणि कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्राने विकासाच्या विविध क्षेत्रांत देशात अग्रस्थान मिळविले आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, गुंतवणूक, रोजगार आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याची प्रगती वेगाने होत असून, विकासाला नवी दिशा मिळाली आहे,असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष व राजे फौंडेशनच्यावतीने कागल येथील श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित 'महारक्तदान शिबिर' उपक्रमाचे उद्घाटन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सांगलीच्या प्रकाशबापु पाटील ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित या शिबीरात १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाला प्राधान्य देत राज्याला नवी दिशा दिली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक,आधुनिक पायाभूत सुविधा आणि जनकल्याणकारी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करणे, याच त्यांना कृतीशिल शुभेच्छा आहेत. कागलसह विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कार्यक्रमास 'शाहू'चे संचालक रमेश माळी, सतीश पाटील,बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील,शिवसिंह घाटगे,कैलास जाधव,उपनगराध्यक्ष जयवंत रावण,नगरसेवक बाळासाहेब माळी,आनंदा पसारे,अरुण गुरव,सुशांत कालेकर,उमेश सावंत, संजय कदम,बंडा बारड,राजेंद्र जाधव प्रमोद कदम,अॕड.बाबासाहेब मगदूम,प्रविण कुराडे,श्रीकांत कोरवी,मारुती मदारे, यांच्यासह शाहू समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




