राधानगरी धरणाबाबत शुक्रवारी कार्यशाळा

राधानगरी धरणाबाबत शुक्रवारी कार्यशाळा

राधानगरी - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा आणि पंचगंगा. नद्यांमध्ये पूर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत राधानगरी धरणात सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत राधानगरी धरणावर नवीन सांडवा बांधकाम करणे तसेच धरणातील सेवाद्वारांची दुरुस्ती करण्याचे काम नियोजित आहे. पाटबंधारे खात्याकडून शुक्रवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

कामांमुळे नदीतील पाणीप्रवाह अधिक नियंत्रीत करता येणार असून, संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.या संदर्भात पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी भागधारक सल्लामसलत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शुक्रवारी सकाळी  १० ते १ वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृह, राधानगरी येथे पार पडणार आहे. या कार्यशाळेत नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी, तसेच इतर संबंधित भागधारकांनी उपस्थित राहून आपले मते मांडावीत, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.