राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले ९७ ठराव
कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज सोमवार २९ रोजी ९७ ठराव दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादीची ठरावसंख्या१,९८२ होणारच असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच; उद्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आणखीन ठराव दाखल केले जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवार २९ रोजी दाखल केलेल्या ९७ ठरावांची तालुकानिहाय आकडेवारी अशी- आजरा ७, चंदगड ३, गडहिंग्लज ५, राधानगरी १४, करवीर ४५, पन्हाळा ६, शाहूवाडी १६, शिरोळ १ असे एकूण 97 ठराव दाखल झाले.




