व्हेनेझुएलातिल सर्वात भीषण भूकंपात 10 हजार बळी? 40 सेकंदात अख्खं शहर जमीनदोस्त

व्हेनेझुएलातिल सर्वात भीषण भूकंपात 10 हजार बळी? 40 सेकंदात अख्खं शहर जमीनदोस्त

अमेरिका (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईमुळे अलीकडे चर्चेत असलेल्या व्हेनेझुएलावर आता मोठं नैसर्गिक संकट कोसळलं आहे. शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जगात सर्वाधिक भूकंपप्रवण देश म्हटलं की सर्वप्रथम जपानचं नाव समोर येतं. मात्र, आता दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाही भीषण भूकंपामुळे चर्चेत आलं आहे. अवघ्या ४० सेकंदांच्या अंतराने ७.१ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या धक्क्यांमुळे राजधानी कराकसमधील अनेक इमारती आणि घरे अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) अंदाजानुसार, या नैसर्गिक आपत्तीत तब्बल १० हजार नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही सेकंदांच्या भूकंपाने क्षणार्धात मोठा विध्वंस घडवून आणला असून हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत.

दरम्यान, उत्तर जपानमध्येही ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. मात्र, सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तरीही, व्हेनेझुएलातील भूकंपामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची जगभरात चर्चा सुरू आहे.या संकटानंतर व्हेनेझुएलासमोर बचावकार्य, पुनर्वसन आणि उद्ध्वस्त झालेल्या जनजीवनाला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.