शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती साजरी
कागल( प्रतिनिधी):युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येथे शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी केली.उत्सवमुर्तीस राजे समरजितसिंह घाटगे राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांच्या हस्ते व राजे विरेंद्रसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत जलाभिषेक घातला. किल्ले पन्हाळगड येथून शिवप्रेमींनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.बसस्थानकावरील कागलअधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या पुतळ्यासही घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ऐतिहासिक श्री.राम मंदिरमध्ये राजमाता जिजाऊ महिला समितीच्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा तसेच शिवगीते गायिली.महिलांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी नवोदितादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित शिवप्रेमींनी रणवाद्यांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवजयंती लोकोत्सव समिती,कागल नगरपालिका,शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




