शाहू दूध संघाची बोनस - ठेव रक्कम संस्थांच्या खात्यावर वर्ग : नवोदिता घाटगे

शाहू दूध संघाची बोनस - ठेव रक्कम संस्थांच्या खात्यावर वर्ग : नवोदिता घाटगे

कागल (प्रतिनिधी) - व्हन्नूर (ता.कागल) येथील श्री.छत्रपती शाहू मिल्क अँड अॕग्रो प्रोड्यूसर कंपनी तथा शाहू दूध संघाकडून सन २०२४-२५ ची अंतिम दूध रक्कम व दूध ठेव रक्कम बोनस स्वरुपात संबंधित संस्थांच्या खात्यावर वर्ग केली आहे,अशी माहिती राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी दिली.

 

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ०१/०४/२०२४ ते  ३१/०३/२०२५ या कालावधीकरीता अंतिम दूध दरापोटी म्हैस व गाय दूधास सदरची रक्कम दिली आहे.

म्हैस दूधास दूध उत्पादकांचेसाठी संघाने खरेदी केलेल्या म्हैस दूधाचे रक्कमेवर शेकडा रु. ४.टक्के तर, गाय दूधास दूधाचे रक्कमेवर शेकडा रु. ३.७३ टक्केप्रमाणे विनाकपात संपुर्ण रक्कम संबंधित संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.

'दिवाळीचा गोडवा-शाहू दूधसंगे वाढवा'

दरम्यान 'दिवाळीचा गोडवा-शाहू दूधसंगे वाढवा' या उपक्रमांतर्गत खास दिवाळीनिमित्त आपल्या प्रियजनांना आरोग्यदायी भेट देण्यासाठी म्हैस तूप,श्रीखंड,आम्रखंड या शाहू दूधच्या उपपदार्थांचा समावेश असलेले आकर्षक गिफ्ट बॉक्स सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत.याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत शाहूच्या दूधासह दही,लस्सी,तूप,श्रीखंड,आम्रखंड, बासुंदी,रबडी बासुंदी,गुलकंद, बासुंदी, ताक,पनीर,खवा,आंबा बर्फी,आंबा मोदक,खवा मोदक,मलाई पेढा,खवा बर्फी या उपउत्पादनांना बाजारात चांगली मागणी असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले.