शिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदान बाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविणार; शिक्षण संचालक शरद गोसावी

शिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदान बाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविणार; शिक्षण संचालक शरद गोसावी

 कोल्हापूर(प्रतिनिधी): राज्यातील शिक्षण सेवकांचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर होणे बाबतचा प्रस्ताव शासनाकडे लकरच पाठविण्यात येईल अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी नुकतीच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिली.

संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने, या पाच - सहा वर्षात अनेक शिक्षण सेवक मयत झाले मयत झाले आहेत. ते त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती असल्याने त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले जाते. शिक्षणसेवक योजनेअंतर्गत सध्या अशा प्रकरणांमध्ये सानुग्रह अनुदानाची कोणतीही तरतूद नसल्याने संबंधित कुटुंबे अडचणीत येतात. त्यामुळे अशा प्रकरणांसाठी रु. 20 लाख सानुग्रह अनुदान व इतर सहाय्य योजना तातडीने लागू करण्यात यावी अशी मागणी शिक्षण संचालक यांचेकडे केली असता संचालकांनी वरील ग्वाही दिली.

        यावेळी प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ सह इतर सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करून फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे, 100% विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, विना अट निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर व्हावेत, मेडिकल बिल कॅश लेस पद्धत सुरु करावी , दिव्यांग, वय वर्षे 50 पूर्ण व आरोग्याची समस्या असलेल्या शिक्षकांना जनगणना कामातून वागळावे, जनगणना पूर्ण होताच कार्यमुक्ती या अटीवर जिल्हातंर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करावी आणि बदली नंतर सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, पदोन्नतीने भरावयाची व रिक्त असलेली विस्तार अधिकारी श्रेणी २ व श्रेणी ३, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व विषय पदे ३१ मे पूर्वी पदोन्नतीने भरण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनास व्हावेत, सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व देयक बील 3 महिन्याच्या आत मिळावे, संच मान्यता करताना आधार मीस मॅच विद्यार्थी ही पकडावेत, लींक द्वारे माहिती मागणी करू नये, आदी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

       शिष्टमंडळात राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या सह राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषध्यक्ष जी एस मंगनाळे, उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, इरफान मिर्झा, प्रमोद मुकेमवार, गोकुळ चारथळ, देवराव आमोदे, आदी सहभागी होते.