'सद्रक्षणाय' धावणाऱ्या खाकीला भागीरथीच्या भगिनींकडून कृतज्ञतेचा 'रक्षाबंधनाचा धागा'

'सद्रक्षणाय' धावणाऱ्या खाकीला भागीरथीच्या भगिनींकडून कृतज्ञतेचा 'रक्षाबंधनाचा धागा'

कोल्हापूर (प्रतिनिधी): 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून २४ तास जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना अनेकदा सण-उत्सवांच्या काळात कर्तव्यावर असल्याने कुटुंबापासून दूर राहावे लागते. या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'भागीरथी महिला संस्थे'च्या वतीने कोल्हापूर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. यंदाही संस्थेच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन पोलीस बांधवांना मनोभावे ओवाळले आणि राखीचा पवित्र धागा बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देत पोलिसांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

विविध पोलीस ठाण्यांतील सोहळा व उपस्थिती:

  • शाहूपुरी पोलीस ठाणे:

    पोलीस निरीक्षक संतोष डोके व कर्मचाऱ्यांना रंजना शिर्के, अर्चना मोटे, पूजा संन्नके, रूपाली कुंभार, दीपा पाटील, राजेश्वरी मोटे, शारदा पोटे आणि सुप्रिया चौगुले यांनी राखी बांधली.

  • लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे:

    पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, प्रमोद खाडे, मयुश्री खरात यांच्यासह कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी शिवानी पाटील, जीविज्ञा क्षीरसागर, गायत्री फाले, राधिका पाटील व शरयू भोसले उपस्थित होत्या.

  • जुना राजवाडा पोलीस ठाणे:

    पोलीस निरीक्षक किरण लोंढे व कर्मचाऱ्यांचे औक्षण करून राखी बांधण्यात आली. या प्रसंगी ऐश्वर्या देसाई, राधा मेस्त्री, कल्याणी पवार-मेढे, सपना मेथे, अनिता सावंत, अश्विनी मिठारी, सायली सावंत, नम्रता सुतार, नक्षत्र सणगरे व दिपाली बेलवलकर उपस्थित होत्या.

  • राजारामपुरी पोलीस ठाणे:

    पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे, मनोज कदम व कर्मचाऱ्यांना छाया ननवरे, सीमा पालकर, चंद्रकला सिदनेर्ली, शुभांगी सूर्यवंशी, दीपिका राकुडे, शीतल ढेरे, गीता करंडे, उर्मिला मराठे व रिया सूर्यवंशी यांनी राखी बांधली.

  • गांधीनगर पोलीस ठाणे:

    भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सुलोचना नार्वेकर यांच्यासह अश्विनी जाधव, मीना गुरव, कोमल सुतार, उमा खांडेकर, अश्विनी पवार, सुनिता अनावर, सविता सुतार, पूजा कांबळे, विद्या पाटोळे व जयश्री तळसदे यांच्या उपस्थितीत उपक्रम पार पडला.

  • करवीर पोलीस ठाणे:

    पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व कर्मचाऱ्यांना रोहिणी वाडकर, प्रियंका वाडकर, रंजना येडगे, सुजल निरगळ, सुनिता कोळी व आरती सांगवडेकर यांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी भागीरथी संस्थेच्या महिला सबलीकरण व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.