सांगलीत “काँक्रीट रिबार फिक्सिंग आणि रॉक अँकरिंग सोल्यूशन” विषयावर चर्चासत्र यशस्वी
कोल्हापूर (प्रतिनिधी) - इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (ISSE), कोल्हापूर शाखेच्या वतीने सांगली येथे "काँक्रीट रिबार फिक्सिंग आणि रॉक अँकरिंग सोल्यूशन" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रिबार फिक्सिंग व रॉक अँकरिंगच्या विविध पद्धती, तांत्रिक बाबी आणि त्यावरील अद्ययावत माहिती सादर करण्यात आली.

कार्यक्रमात वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक व प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनिअर श्री. घारपुरे, डॉ. ए. बी. कुलकर्णी आणि डॉ. पाटणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सांगली व कोल्हापूर परिसरातील अनेक स्ट्रक्चरल इंजिनिअर्स या चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी ICFS कंपनीचे संचालक संदीप इंगळे, निखिल वझे, डॉ. संतोष तोडकर आणि इंजि. प्रशांत हडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ICFS, कोल्हापूर या कंपनीने केले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात ISSE चे संचालक इंजि. मंदार आंबेकर, इंजि. जिया मोमिन, डॉ. रश्मी जाधव, इंजि. हिमांशु परिख, इंजि. नंदकुमार बने, इंजि. प्रणव कुलकर्णी, इंजि. मुकुल परिख, डॉ. प्राची सोहनी, इंजि. राजय बलवान, डॉ. फडतरे यांचे तसेच ICFS कंपनीच्या तज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




