१४ वर्षांचा यशस्वी प्रवास : साईनाथ मल्टिस्टेटचा ११ जुलै रोजी १४ वा वर्धापन दिन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकार आणि वित्तीय क्षेत्रात विश्वासार्हता व पारदर्शकतेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या साईनाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडने यशस्वी १४ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने शनिवार, ११ जुलै रोजी संस्थेचा १४ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सध्या संस्थेने २१ शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत विस्तार केला असून ३०० कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा टप्पा पार केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम आनंदराव जाधव यांनी दिली आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन आणि सभासद स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. तसेच सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचारी यांच्या विश्वासामुळेच संस्थेने हे यश संपादन केले आहे. गुणवत्तेमुळे संस्थेला महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचा 'अ' ऑडिट वर्ग प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
तर भविष्यात सर्व शाखांचे संगणकीकरण आणि अत्याधुनिक इमारती उभारण्यात येतील. तसेच डिजिटल सेवा, सुलभ कर्ज योजना आणि सभासदांच्या हिताच्या नवीन उपक्रमांद्वारे साईनाथ मल्टिस्टेट अधिक सक्षम वित्तीय संस्था म्हणून पुढे वाटचाल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.




