१८ हजारांच्या पगारावर घरात नवी अलिशान गाडी अन् जमीन!; अहिरांच्या घरात २.६५ कोटींचा डल्ला मारणाऱ्या नोकरांचा भांडाफोड

१८ हजारांच्या पगारावर घरात नवी अलिशान गाडी अन् जमीन!;  अहिरांच्या घरात २.६५ कोटींचा डल्ला मारणाऱ्या नोकरांचा भांडाफोड

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या मुंबईतील निवासस्थानातून २ कोटी ६५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अजून तीन नोकरांना अटक केली आहे."

"पोलिसांनी यापूर्वी प्रवीण सोळंकी नावाच्या आरोपीला अटक केली होती, ज्याच्याकडून १५ लाखांचा मुद्देमाल आणि ३० लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्हे शाखा युनिट-३ ने सतीश कुमार मिस्त्री, अमित यादव आणि सूरज गौतम या तीन नोकरांनाही गजाआड केले आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या वर पोहोचली आहे.

न्यायालयाने नव्याने अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे."

"सचिन अहिर यांचे पुत्र कृष्णा अहिर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, हे नोकर गेल्या १३ ते १७ वर्षांपासून त्यांच्याकडे विश्वासाने काम करत होते. घरातील सर्व मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची त्यांना पूर्ण माहिती होती. गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला घरात लागलेल्या आगीत सर्व दागिने जळून खाक झाल्याचा समज कुटुंबाचा झाला होता. मात्र, एका अज्ञाताने अहिर कुटुंबाला पाठवलेल्या काही फोटोंमुळे या कोट्यवधींच्या चोरीचा भांडाफोड झाला!"

"महिन्याला अवघ्या १८ हजार रुपयांवर काम करणाऱ्या सतीश आणि अमित या नोकरांनी झारखंडमधील आपल्या मूळ गावी अचानक नवीन घर बांधले होते, तसेच जमीन, चारचाकी गाडी आणि टेम्पो खरेदी केला होता. नातेवाईकांच्या खात्यातही मोठी रक्कम ट्रान्सफर केली होती. जेव्हा अज्ञाताने या सर्वांचे फोटो पुरावे म्हणून अहिर यांच्या कुटुंबाला पाठवले, तेव्हा या कोट्यवधींच्या चोरीचा संपूर्ण कट समोर आला."

"अनेक वर्षांपासून विश्वासाने ठेवलेल्या नोकरांनीच कोट्यवधींचा डल्ला मारल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी आता मुंबई गुन्हे शाखा सखोल तपास करत आहे.