..अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची तारीख ठरली

..अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची तारीख ठरली

कोल्हापूर (प्रतिनिधी)  राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडून तब्बल १५ दिवस उलटले असतानाही अध्यक्ष व सभापती पदांची निवड न झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.ग्रामविकास विभागाने आज एक महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करत जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या परिपत्रकानुसार २० मार्चपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदे रिक्त असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा होती. दरम्यान, पंचायत समिती सभापती निवडीबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.आता कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये  महायुती चा अध्यक्ष होणार आहे, पण राष्ट्रवादी चा अध्यक्ष कि भाजपचा याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २० मार्चपूर्वी अध्यक्ष निवडीची  प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने सत्तास्थापनेबाबत हालचालींना वेग आला असून, राजकीय घडामोडींना उधाण आले आहे.