ओळखू न येण्याइतका बदलला सचिन घायवळ; राजस्थानमधील पहिला फोटो समोर

ओळखू न येण्याइतका बदलला सचिन घायवळ; राजस्थानमधील पहिला फोटो समोर

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला काल गुरूवारी,दि ४ राजस्थानातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन घायवळ याला राजस्थानातून पकडण्यात यश आले आहे. पोलीस अनेक दिवस निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळच्या मागावर होते.

सचिन घायवळ याला राजस्थानातील सिकर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सचिन याच्या विरोधात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सचिन घायवळ गेल्या ९ महिन्यांपासून फरार होता. सचिन याच्या विरोधात 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. पुणे येथील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कर्वेनगर, शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीतील संचालक महिलेकडून ही खंडणी उकळण्यात आली होती. त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुरु केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी तपास करत त्याला राजस्थानमधून ताब्यात घेतलं आहे.

सचिन घायवळच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा पिंजून काढला होता. शेवटचा तो जामखेड परिसरातील ऊसाच्या शेतातून फरार झाल्याची माहिती होती. सचिन घायवळ आपले नाव आणि वेष बदलून राजस्थानात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. त्याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. सचिन घायवळचा फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणे देखील शक्य नव्हते. सचिन घायवळने दाढी,केस वाढवले होते. त्याचा पूर्ण अवतार वेगळा झाल्याचं अटक केलेल्या पहिल्या फोटोमधून दिसून आला आहे.

काल गुरूवारी दि ४ रात्री उशिरा सचिन घायवळ याला ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सचिन हा गुंड निलेश गायवळ मोठा भाऊ आहे. सचिन वर खून, खंडणी, खुनाचे प्रयत्न, धमकी यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सचिन फरार होता. राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून सचिन घायवळला ताब्यात घेतलं आहे.

 तर पोलिसांकडून मकोका कारवाई झाल्यानंतर अखेर नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) याला अखेर पुणे पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात सापळा रचून ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.