आशिष शेलार यांच्या व्हिडीओवरून सुषमा अंधारें यांचा मोदी आवाहनावर निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी थेट दुचाकीवरून विधान भवन गाठल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः 'रॉयल एनफिल्ड ३५०' ही बाईक चालवत विधान भवनात दाखल झाले.

मुख्यमंत्र्यांच्या सोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील दुचाकीवरून या प्रवासात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला, आज विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी सर्व आमदार, मंत्री, नेते विधान भवन येथे आले होते, यादरम्यान मंत्री आशिष शेलार आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांचा एक ८ ते १० सेंकदांचा मिश्किल चर्चेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये शेलार अनिल परब यांना टाळी देत म्हणतात की, अनिल परब आणि आशिष शेलार एकमेकांना पाहून हसून पुढे जाताना शेलार म्हणतात एवढ्या गाड्या कमी केल्या. एकदिवशी चालत आणि नंतर सुरक्षारक्षकाला सुद्धा खांद्यावर घेऊन यावे लागेल. यावर अनिल परब हसून सकारात्मक प्रतिसाद देतात आणि दोघेही हसत एकमेकांना टाळ्या देऊन पुढे जातात. हा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पोस्ट केली आहे, यामध्ये अंधारेंनी आशिष शेलारांवर टीका करत म्हटलंय की, "घोर अनर्थ..! भाजपचे सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवत आहेत."




