केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात एशियाटिक सोसायटीलाही भेट; पाच खंडांतील भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास पाहणार
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुढील आठवड्यात मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, रविवारी 13 सप्टेंबर रोजी ते फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहेत. प्राच्यविद्या क्षेत्रात दोन दशके संशोधन कार्य करणाऱ्या एशियाटिक सोसायटीला अमित शाह भेट देणार असून, यावेळी ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सदस्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा विशेष दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. अमित शाहांच्या भेटीमुळे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशांना अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एशियाटिक सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अमित शाहांना भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर शाहांनी मुंबई दौऱ्यात एशियाटिक सोसायटीला भेट देण्यास मान्यता दिल्याची माहिती आहे.
अमित शाह यांच्या भेटीदरम्यान संस्थेकडील दुर्मिळ पोथ्यांचे प्रदर्शन त्यांना दाखवले जाणार आहे. भारतीय दंड संहिता आणण्यात अमित शाह यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले जाते. भारतीय दंड संहितेचा उगम धर्मशास्त्रामध्ये असल्याचे मानले जाते. अशातच, पा. वा. काणे यांनी लिहिलेला पाच खंडांतील ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ संस्थेने जतन करून ठेवला आहे.
गृहमंत्री अमित शाह रविवारी एशियाटिक संस्थेला भेट देणार असून, सोमवारी हिंदी राजभाषा संमेलनात उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या आठवड्यात मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहेत. नुकतीच झालेली या संस्थेची निवडणूक वादग्रस्त ठरली होती. भाजप आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या ‘एशियाटिक टुमारो’ या गटाने ही निवडणूक जिंकली होती. अमित शाह यांच्या भेटीदरम्यान संस्थेकडील दुर्मिळ पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार आहे.
संस्थेच्या निवडणुका जुलै महिन्यात पार पडल्या आणि भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे अध्यक्ष झाले. गृहमंत्री अमित शाह यांनी संस्थेला भेट द्यावी, असे पत्र डॉ. सहस्रबुद्धे यांनी अध्यक्ष या नात्याने शाह यांना दिले होते. त्यानुसार या आठवड्यातील मुंबई दौऱ्यादरम्यान संस्थेला भेट देण्याचे शाह यांनी मान्य केले आहे. तर रविवारी एशियाटिक संस्थेला भेट दिल्यानंतर सोमवारी वाशीमध्ये होणाऱ्या हिंदी संमेलनाला अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाशीत हिंदीचे राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन होणार असून, या संमेलनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 14 आणि 15 सप्टेंबर असे दोन दिवस हे संमेलन होणार आहे. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री तसेच अधिकारीही सहभागी होण्याची शक्यता आहे.
सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच 10 हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर वाशीत होणाऱ्या हिंदी राजभाषा संमेलनामुळे राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच, केंद्राचा मोठा हिंदी कार्यक्रम मुंबईच्या वेशीवर होणार आहे.




