जिल्हा उपाध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा कोर कमिटी मेंबर पदी प्रकाश देशमुख यांची निवड
पोर्ले तर्फ ठाणे - आसूर्ले ता. पन्हाळा येथील प्रकाश बळवंत देशमुख (भाऊ) यांची भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण पूर्व) पदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. प्रकाश देशमुख यांनी बूथ प्रमुख, तालूका सचिव, तालुका उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. शाहूवाडी मतदारसंघात पक्षाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. तसेच पक्षवाढ व संघटना मजबूत करण्यात शाहूवाडी विधानसभा मतदार संघात त्यांचे मोलाचे कार्य आहे. देशमुख यांच्या कामाची दखल घेवून पक्षाने सलग दुसऱ्यांदा जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच कोल्हापूर जिल्हा कोर कमिटी मेंबर पदी निवड केली आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांचा पक्षाने योग्य सन्मान केल्याने विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
निवडीसाठी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आ. चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. राहूल आवडे, सूरेश हाळवणकर, विजेंद्रसिंह माने, अजय भाऊ चौगुले व तालूका अध्यक्ष अमार अमरसिंह भोसले यांचे सहकार्य लाभले. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी निवडीचे पत्र दिले.




