नगरसेविका दीपाली घाटगेंची तत्परता ; धोकादायक झाड सुरक्षितपणे घेतले हटवून

नगरसेविका दीपाली घाटगेंची तत्परता ; धोकादायक झाड सुरक्षितपणे घेतले हटवून

कोल्हापूर/ प्रतिनिधी : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ताराबाई पार्क परिसरातील झाड कोसळून वाहनांचे नुकसान आणि नागरिक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, उद्योग भवन परिसरातील कनाननगर रोडवरील कोणत्याहीक्षणी कोसळू शकणारे भलेमोठे झाड नगरसेविका दीपाली घाटगे यांच्या सतर्कतेमुळे महापालिकेने सुरक्षितरीत्या हटवले. यामुळे संभाव्यमोठी दुर्घटना टळली आहे.

मुसळधार पावसामुळे उद्योग भवन परिसरातील कनाननगर रोडवरील एक भलेमोठे झाड मधून तडकले होते. झाडाच्या एका बाजूला उद्योग भवन, तर दुसऱ्या बाजूला दाट लोकवस्ती असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.या धोकादायक परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेविका दिपाली घाटगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आणि तात्काळ ते झाड उतरवून घेतले. 

यासंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि आवश्यक उपाययोजनांसाठी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.