पाडळी खुर्द मतदार संघात जि.प . राजेंद्र सुर्यवंशी व वाशी पं. स अमित हजारे, तर शिरोली दुमाला पं स. आनंदा शिरोलीकर विजयी .

पाडळी खुर्द मतदार संघात जि.प . राजेंद्र सुर्यवंशी व वाशी पं. स   अमित हजारे, तर शिरोली दुमाला पं स. आनंदा शिरोलीकर विजयी .

करवीर प्रतिनिधी (विश्वनाथ मोरे ): करवीर तालुक्यातील हाय व्होल्टेज म्हणून ओळखली जाणारी पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समिती यामध्ये तगड्या उमेदवारांचे आव्हान होते .यामध्ये पाडळी खुर्द जिल्हा परिषद साठी राजेंद्र सूर्यवंशी व वाशीपंचायत समिती साठी अमित हजारे आणि शिरोली दुमाला पंचायत समिती साठी आनंदा शिरोलीकर हे विजयी झाले आहे.

मतदारसंघांमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील तसेच कुंभी कासारी साखर कारखाना 6 संचालक अशा नियोजन बद्धअसणाऱ्या अनुभवींच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेले शिंदे गटातून सचिन विश्वासराव पाटील,अजित पवार गट राष्ट्रवादी मधून उभे राहिलेले राजेंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून डॉ . के एन पाटील .अशी तुल्यबळ जिल्हा परिषद साठी उमेदवार होते .तर वाशी पंचायत समिती साठी शिंदे शिवसेना पक्षातून अमित आप्पासो हजारे,अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षातून मोहन पाटील,राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला पंचायत समिती मधून शिंदे शिवसेना गटातून नामदेव खांडेकर,अजित पवार गट राष्ट्रवादीतून आनंदा शिरोलीकर,तर राष्ट्रीय काँग्रेस मधून हिंदुराव कांबळे या उमेदवारांनी ही निवडणूक लढवली .

         सुरुवातीपासूनच या निवडणुकीकडे साम दाम दंड या नीतीचा वापर करत सुरू असलेला प्रचार,वाढत चाललेली उत्कटा,प्रचार व प्रचार सभा यामध्ये होणारे आरोप प्रत्यारोप,विकासाचे जाहीरनामे या सर्व बाजूने ही निवडणूक लढवली होती.यामध्ये पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र सूर्यवंशी,वाशी पंचायत समितीसाठी अमित हजारे,शिरोली दुमाला पंचायत समितीसाठी आनंदा शिरोलीकर हे विजयी झाले आहेत .