प्रभाकर खांडेकर यांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर पक्ष प्रवेश

प्रभाकर खांडेकर यांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर पक्ष प्रवेश

बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिक्षण मंत्री दादा भूसे साहेब व मंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना ( ठाकरे) गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकरदादा खांडेकर यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्यांच्या सोबत ॲटलास कंपनी युनियनचे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष क्रुष्णा पाटील, ॲडव्होकेट व उद्योगपती महेशदादा खांडेकर,प्रथमराज खांडेकर यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला, यावेळी उपस्थित तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे, प्रताप उर्फ पिणू पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.