बीडमध्ये हृदयद्रावक घटना! मुलगा गमावल्यानंतर मदतीसाठी आलेल्या वृद्ध वडिलांचा मृत्यू

बीडमध्ये हृदयद्रावक घटना! मुलगा गमावल्यानंतर मदतीसाठी आलेल्या वृद्ध वडिलांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या 68 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बीडच्या केज येथे घडली. श्रीकांत शिंदे हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी आलेले रसूल गफूर सय्यद असं वृद्धाचं नाव आहे. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, त्या संदर्भात काही मदत मिळेल यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी रसूल सय्यद हे कुटुंबातील सदस्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते.

मोठ्या प्रमाणात गर्दी होती, उष्णता ही होती त्यामुळे श्वास घ्यायला त्रास झाला आणि गुदमरल्यासारखे झाले त्यावेळी आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला असं. त्यांचा मुलगा पाशा सय्यद यांनी सांगितला. माझ्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वार्डात वयोवृद्ध पेशंट आले होते. आल्यानंतर आम्ही सीपीआर देऊन उपचार केला मात्र यश आले नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असं डॉ बालासाहेब अस्वले यांनी सांगितलं.

खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल सय्यद यांचे हृदयविकाराने निधन झाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी  सय्यद कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या 78 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. बीडच्या केज दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

 रसूल गफूर सय्यद यांच्या मुलाने माहिती देताना सांगितले की, १० मे ला त्यांचा भाऊ, त्याचे कुटुंब (पत्नी आणि मुले) आणि इतर नातेवाईक धानेगाव येथे त्यांच्या मामाकडे गेले होते. तिथून परत येत असताना, त्यांनी तलाव पाहण्याचे ठरवले. तलावाजवळ गेल्यानंतर पाण्यात उतरले असता, त्यांच्या भावाच्या मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडू लागली. भावाला पोहता येत नव्हते, तरीही स्वतःची मुलगी असल्यामुळे त्याने पाण्यात उडी घेतली. त्याने मुलीला सुखरूप बाजूला काढले, मात्र स्वतः पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर कुटुंबाला काही आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ते मंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी गेले होते. (या संदर्भात आधी त्यांची तालुकाध्यक्षांशीही चर्चा झाली होती.) तिथे निवेदन देण्यासाठी गेले असताना, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वडिलांना दम छाटल्यासारखे होऊ लागले आणि त्यांच्या छातीत दुखू लागले. तिथेच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टरांनी सीपीआर (CPR) देखील दिला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि वडिलांचाही मृत्यू झाला.