मतदानानंतर अभिनेता शशांक केतकरने का केला संताप व्यक्त..?

मतदानानंतर अभिनेता शशांक केतकरने का केला संताप व्यक्त..?

मुंबई - निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मराठी अभिनेता शशांक केतकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे. ठाण्यातील एका इंटरनॅशनल शाळेत मतदान करून बाहेर पडताच, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील अस्वच्छतेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि अस्ताव्यस्त परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. यावर शशांकने तीव्र नाराजी व्यक्त केली. “ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या अगदी बाहेर ही अवस्था आहे, असे तो व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो. विशेष म्हणजे ही शाळा इंटरनॅशनल असल्याचे नमूद करत त्याने व्यवस्थेवर उपरोधिक टोला लगावला आहे.

मतदानानंतर स्वतः चा आणि शाळेबाहेरील कचऱ्याचा ढीग असा दोन्ही दृश्ये व्हिडिओत टिपत शशांकने तेथील वास्तव परिस्थिती समोर आणली. ठाण्यातील एका ‘इंटरनॅशनल’ शाळेबाहेर अशी दयनीय अवस्था पाहून त्याने संताप व्यक्त केला, तसेच मिश्किल शब्दांत व्यवस्थेवर टीका केली.

आपल्या पोस्टमध्ये शशांकने स्पष्ट केले की, मतदान केंद्राजवळच अशी अस्वच्छता असणे हे व्यवस्थेचे अपयश आणि नागरिकांच्या उदासीनतेचे द्योतक आहे. शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असली तरी मूलभूत स्वच्छतेचा अभाव दिसून येतो, हे नकारात्मकता नसून वास्तव असल्याचे त्याने नमूद केले.

https://www.instagram.com/reel/DThEUcjiBMW/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

तसेच, ही भावना निराशावादातून नसून वास्तवावर आधारित असल्याचे सांगत शशांक म्हणाला की, उद्या कोणताही पक्ष सत्तेत आला तरी ‘स्वच्छता’सारख्या मूलभूत प्रश्नावर ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा वाटत नाही. तसेच नागरिकही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला आहे.