मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील अतिक्रमणावर निर्मुलन पथकाची कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील व परिख पूल परिसरातील 26 हातगाड्या व 3 केबीनवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर दसरा चौक, सीपीआर चौक ते छत्रपती शिवाजी पूल या मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्डवर कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे व अतिक्रमण कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.
तरी शहरामध्ये अनाधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर आलेल्या अनाधिकृत लोंखडी जाळी, हातगाडी, केबीन व शेडवर कडक कारवाई करण्यात येणार असून दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे तसेच दुकानाबाहेर पार्कीगच्या ठिकाणी लावण्यात आलेली स्टॅण्ड बोर्ड कोणीही लावू नये अन्यथा अशा दुकानधारकांवर जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




