खुनाच्या गुन्हयातील चौघांना अवघ्या ०८ तासांच्या आत अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) - हॉटेल मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून २८ ऑक्टोबर रोजी रात्री ०१ ते ०२ च्या सुमारास अभिनंदन जयपाल कोल्हापूरे याच्या घरी जाऊन ३ ते ४ इसमांनी अभिनंदन कोल्हापूरे याला त्याच्याकडील असणाऱ्या मोटर सायकलवर बसवून कबनूर गावच्या हद्दीत एका पेट्रोल पंपा समोर अभिनंदन कोल्हापूरे याला नेले. त्याच्या डोक्यात ३ ते ४ जणांनी सिमेंटची पाईप घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी डॉ. अभिषेक जयपाल कोल्हापूरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलीसांनी या खूनाचा अवघ्या ०८ तासात छडा लावत पंकज संजय चव्हाण वय २७, रा. कबनूर त्याच्या सोबत असलेले रोहित जगन्नाथ कोळेकर वय २४, रा. कागल, विशाल राजू लोंढे वय ३१, रा. इचलकरंजी, आदित्य संजय पवार वय २१, रा. इचलकरंजी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या आरोपींकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्यांनी रोहित कोळेकर याचे बरोबर हॉटेल वैशाली येथे रात्री झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन आरोपीत यानी अभिनंदन कोल्हापूर यास त्याचे घरातुन अपहरण करुन त्याचे डोक्यात सिमेंटची पाईप टाकुन त्याला ठार मारल्याची कबूली दिलेली आहे. यातील आरोपींना गुन्हयाचे पुढील तपास कामी शिवाजीनगर पोलीस ठाणेच्या ताबेत देणेत आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले, सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्यासह आदी पोलीसांनी सहभाग घेतला होता.




