मनोज जरांगे यांचे सकल मराठा समाजाच्यावतीने स्वागत

मनोज जरांगे यांचे सकल मराठा समाजाच्यावतीने  स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील  कोल्हापुर दौऱ्यावर आले असत सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे  मासाहेब ताराराणी चौक येथे जोरदार स्वागत करण्यात आले. 

रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष आश्विन कुमार वागळे यांनी मनोज जरांगे यांचे स्वागत केले. यावेळी उमेश पवार,तानाजी हातकर, प्रशांत सासणे, ओमकार नलवडे, अभी पाटील, अभिषेक कित्तूर, अप्पासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.