मर्दानी 3 चा धाक; या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका

मर्दानी 3 चा धाक; या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका

मुंबई (प्रतिनिधी) : रणवीर सिंह स्टारर धुरंधर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुरळा उडवून दिला आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांना खेचण्यासाठी हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. या सिनेमानं अनेक चित्रपटांना धोबीपछाड केला आहे. या आठवड्यात शुक्रवारी कोणताही सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार नाहीये. मात्र, ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.रानी मुखर्जीचा कॉप थ्रिलर ड्रामा मर्दानी 3 असो किंवा विजय सेतुपतीचा काटान. या आठवड्यात दमदार सिनेमे आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

देशभरातील बॉक्स ऑफिसवर 51.72 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केल्यानंतर मर्दानी 3 हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. हा सिनेमा आता 27 मार्चपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.या आठवड्यात विजय सेतुपतीचा 'Kaattaan' ही वेब सिरीज प्रचंड चर्चेत राहिली. तामिळ भाषेत तयार झालेल्या या सिरीजची सुरुवात, कापलेल्या डोक्याने होते. या रहस्यमयी, थ्रिलर वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सिरीज आपल्याला 27 मार्च पासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

बेट ही एक मजेदार वेब सिरीज आहे. या सिरीजमध्ये ऑस्कर आणि एमी अवॉर्ड विनर रिज अहमदनं प्रमुख भूमिका साकारली आहे. ६ एपिसोड असणारी ही वेब सिरीज 25 मार्च रोजी रिलीज होणार आहे. प्राईम व्हिडिओवर आपल्याला ही सिरीज पाहता येईल.हा हार्टब्रेक हायस्कूलचा अंतिम सीझन आहे. टर्म 4 वेळ हार्टले हाईची क्लास आता शाळेला निरोप देत अडल्ड वर्ल्डमध्ये प्रवेश करतात. Heartbreak High season 3 ही वेब सिरीज 25 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

88 मिनिटांचा अॅक्शन थ्रिलर फिल्म प्रिटी लिथल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांना नक्की रोमांचित करेल. हा सिनेमा आपल्याला 25 मार्चपासून प्राईम व्हिडिओवर पाहता येईल.डिटेक्टिव्ह होल या 9 भागांच्या सिरीजमध्ये टोबियास सँटेलमनने ओस्लोमधील एका गुप्तहेर हॅरी होलची भूमिका साकारली आहे. ही सिरीज आपल्या Netflixवर 26 मार्चपासून पाहता येईल.'समथिंग व्हेरी बॅड इज गोइंग टू हॅपेन' ही एक अमेरिकन हॉरर मिनी सिरीज आहे. या सिरीज आपल्या शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही सिरीज आपल्याला Netflix वर 26 मार्चपासून पाहता येईल.