महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात नागरीकांना पहावयास मिळणार मतदार यादी

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात नागरीकांना पहावयास मिळणार मतदार यादी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरच्या मतदार याद्या प्रभाग निहाय महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. १ ते ४ (फोटो असलेली हार्ड कॉपी), महानगरपालिका संकेतस्थळावर (विना फोटोची सॉफ्टकॉपी) प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या पुर्वी प्रसिध्द करण्यात आले प्रमाणे ताराबाई पार्क मुख्य निवडणूक कार्यालयातील ठेवण्यात आलेली मतदार यादी (फोटोची हार्ड कॉपी) नागरीकांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील छत्रपती ताराराणी सभागृह (स्थायी समिती सभागृह) येथे ठेवण्यात आलेली आहे.

तसेच प्रारुप मतदार यादीवर हरकती/सुचना २० ते २७ नोव्हेंबर २०२५ अखेर सकाळी १०.०० ते सायं ५.०० पर्यंत सदरच्या हरकती / सूचना या महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडील प्राधिकृत अधिकारी यांचेकडे नमुना - अ (मतदारांसाठी) व नमुना - ब (तक्रारदांसाठी) या नमुन्यात सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.