मानसिंग पाटील यांची देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी): पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी मानसिंग पाटील यांची निवड करावी अशी मागणी मानसिंग पाटील युवा मंचच्या वतीने करण्यात आली, तसेच याबाबतचे निवेदन मंचच्या वतीने आमदार अमल महाडिक यांना देण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद बरेच वर्ष रिक्त असून सदरची समिती स्थापन करत असता मानसिंग पाटील यांचा अध्यक्षपदासाठी विचार करण्यात यावा, मानसिंग पाटील हे गेले 25 ते 30 वर्ष सामाजिक, राजकीय, सहकार, धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याचबरोबर संयमी अभ्यासू व धार्मिक परंपरांचे पालन करणारे व्यक्तिमत्व आहे.
हिंदू परंपरेतील सर्व सण, उत्सव जबाबदारी आणि उत्साहाने संपन्न करण्यामध्ये त्यांचा कायम पुढाकार असतो व सर्वत्र स्वच्छ प्रतिमा चेहरा असून त्यांच्या ह्याच कामाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी माधवी पाटील या सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी मानसिंग पाटील यांना दिल्यास देवस्थान समितीचा कार्य कारभार श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळतील अशी भावना या निवेदनात व्यक्त केली आहे.




