मोक्का अंतर्गत १३ जणांवर मोठी कारवाई
अकलूज - मौजे अकलुज, तालुका माळशिरस येथील लक्ष्मण बंदपट्टे व ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी त्यांचे साथीदारासह गंभीर गुन्हे केलेबाबत पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत. या गुन्हेगाराची टोळी सक्रीय असून त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटीतरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेली होती. या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी मागील 10 वर्षामध्ये सातत्याने टोळी सदस्यांनी घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, घातक हत्याराने सज्ज होवून गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवलेली होती.

गुन्हेगार टोळीतील सदस्या विरूध्द यापुर्वी विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. 14 जून 2025 रोजी या टोळीने संयुक्तरित्या एकत्र येवून खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यावरून अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी हे संघटीतरित्या एकत्र येवून टोळीचे वर्चस्व राहावे व त्यातुन टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारवांर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम 1999 या कलमाचे अंतर्भाव होणेबाबचा प्रस्ताव अकलुज पोलीस ठाणे कडून सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम प्रमाणे मोक्का कायदयान्वये कलमांचा अतंर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांना असल्याने मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी शिफारशी सह प्रस्ताव सादर केला होता.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सदर गुन्हेगार टोळीतील आरोपीता विरूध्द संघटीतरित्या एकत्र येवून केलेले गुन्हे, गुन्हेगारी पार्श्वभूमी, टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे, बेहिशोबी मालमत्ता बाळगणे, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपीना मोक्का कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे तसेच या गुन्हयाचा पुढील तपास संतोष वाळके, उप विभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज यांचेकडे देण्यात आला आहे.
मोक्का लावण्यात लावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे -
1) लक्ष्मण बाबाजी बंदपटटे, रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस, 2) बाजीराव हणंमत सरगर रा. खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापूर, 3) शंकर अशोक काळे, रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस,4) ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, 5) राजु ज्ञानेश्वर काळे, 6) अर्जुन दत्ता चौगुले, 7) अतुल दत्तात्रय काळे, 8) आकाश रमेश धोत्रे, 9) बाळु भारत मदने, 10) रोहीत मारूती काळे, 11) सलीम अब्दुल तांबोळी, 12) मनोज अशोक काळे, 13) किशोर राजेंद्र नवगन, सर्व राहणार इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर
या कारवाईत सुनिल फुलारी, विषेश पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, संतोष वाळके, एस.डी.पी. ओ. अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि. निरज उबाळे अकलुज पोलीस ठाणे यांच्यासह अकलूज पोलीस ठाणेकडील, सपोनि योगेश लंगोटे, पोउपनि. सुधीर खारगे, पोह अमोल बकाल, समीर पठाण, रियाज तांबोळी, हरीष भोसले यांच्यासह आदी पोलीसांनी सहभाग घेतला.




