युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात युवती सेनेच्या वतीने वृक्षारोपण

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात युवती सेनेच्या वतीने वृक्षारोपण

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दरवर्षी वाढदिवस महाराष्ट्र राज्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. याच हेतूने आज कोल्हापूर युवती सेनेच्या वतीने के. एम. सी कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला. यावेळी विविध प्रकारची 25 झाडे के. एम. सी कॉलेज परिसरात लावण्यात आली.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, युवती सेनेच्या जिल्हा युवती अधिकारी मिस कृष्णा जाधव, उपशहर युवती अधिकारी तृप्ती विभुते, तालुका युवती अधिकारी समृद्धी गुरव, उपशहर युती अधिकारी प्रज्ञा लोणारे, सोनिया चव्हाण, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर प्रमुख ओंकार मंडलिक, उपशहर प्रमुख अक्षय मोरे, भार्गव भोसले,विभाग प्रमुख अनिकेत घोरपडे यांच्यासह आदी उपस्थित होते.