शरद इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न
यड्राव (प्रतिनिधी) - यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये "ब्रिजिंग रिसर्च आणि एआय : एमएल आणि डीएलमध्ये पद्धतशीर प्रगती" या विषयावर एक आठवडीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) पार पडला. महाविद्यालयातील कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व आर्टिफिशयल इंटेलिजेन्स विभागामार्फत एआयसीटीई-अटल प्रायोजित हा कार्यक्रम झाला.

यामध्ये संशोधन व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML) तसेच डीप लर्निंग (DL) या क्षेत्रातील आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान सहभागी अध्यापकांना मिळावे हा होता. यावेळी मायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय, मशीन लर्निंगची मूलतत्त्वे, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, कम्प्युटर व्हिजन, एआय आधारित वैद्यकीय प्रतिमा निदान (Medical Image Diagnostics) आदी विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली. त्यासोबत इंडस्ट्री 4.0 मधील एआयचा उपयोग, डेटा प्री-प्रोसेसिंग तंत्रे, तसेच रिसर्च पेपर लेखनाविषयीही सत्रे झाली. तांत्रिक चर्चा, प्रश्नोत्तरे आणि सहभागींच्या शंकानिरसनासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात विविध महाविद्यालयांतील शिक्षक व संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमावेळी तानाजी सुलगावे, प्रज्योत पाटील, डॉ. पूजा बागणे, डॉ. दत्तप्रसाद तोरसे, डॉ. दिलिप अलदार, सोगिता गुलवाणी, सुर्यकांत डोमिसे, डॉ. प्रसन्न शेटे, यामीन हकीम या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. इलेक्ट्रॉनिक्सचे विभाग प्रमुख डॉ. पी. एस. पाटील, कॉम्प्युटरचे विभागप्रमुख डॉ. शशीधर गुरव, एआयचे विभागप्रमुख डॉ. अमित चिंचवाडे यांनी संयोजन केले होते.
यावेळी प्र. प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे, फॅकल्टी डिन प्रा. जी. व्ही. पुजारी यांच्यासह सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.




