शिरोली दुमाला, गणेशवाडी, कसबा बीड मध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या नोटिसांची होळी
करवीर (प्रतिनिधी) : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी विरोध होत असताना आज शिरोली दुमाला, गणेशवाडी आणि कसबा बीड या 3 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाने दिलेल्या जमीन मोजणीच्या नोटिसांची होळी केली. सकाळी 10 वाजता शिरोली दुमाला येथील ग्रामपंचायत चौकात शेतकरी जमा झाले होते. शासनाने गेल्या आठवड्यात या 3 गावातील शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी सर्व नोटिसा एकत्र करून पेटवून दिल्या.

यावेळी शिरोली गावचे सरपंच सचिन पाटील,सर्व सदस्य, एस के पाटील, अनिल सोलापुरे, संजय पाटील,कुंभी कासारी साखर कारखाना संचालक किशोर पाटील,बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. तर गणेशवाडी ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्व पदाधिकारी, कुंभी कासारी साखर कारखाना संचालक दादासो लाड, नामदेव यादव , नामदेव माने, मारुती थोरवशी व बाधित शेतकरी उपस्थित होते. आणि कसबा बीड गावचे सरपंच संतोष मोरे,उपसरपंच विजय गावडे,सर्व सदस्य,कुंभी कासारी साखर कारखाना संचालक उत्तमराव वरुटे, शेतकरी नेते मुकुंद पाटील, बाधित शेतकरी प्रताप पाटील, युवराज पाटील, कुंभी बँकेचे संचालक पंडित वरूटे यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते .




