श्रद्धा इन्स्टिट्यूटचे जेईई व नीट परीक्षेत पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान - महापौर.उदय धातुंडे

श्रद्धा इन्स्टिट्यूटचे जेईई व नीट परीक्षेत पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान - महापौर.उदय धातुंडे

कोल्हापूर (प्रतिनिधी):नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारा घेण्यात आलेल्या व अभियांत्रिकी प्रवेशातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जेईई मेन्स 2026 परीक्षेच्या सेशन 1चा निकाल नुकताच जाहीर झाला.  या परीक्षेत इचलकरंजी मधील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त करून खूप मोठे यश संपादन केले. श्रद्धा इन्स्टिट्यूटने या परीक्षेत पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान ठेवले आहे असे  गौरवोद्गार महापौर उदय धातुंडे यांनी केले. श्रद्धा इन्स्टिट्यूटचा प्रणव बागरेचा या विद्यार्थ्याने 99.97 % पर्सेंटाइल मिळवून श्रद्धाचे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमधील वर्चस्व अबाधित राखले. 

या विद्यार्थ्यांसहित कु.पाटील सोहम 99.90 पर्सेंटाइल, कोरे प्रणव 99.77 पर्सेंटाइल, म्हेत्रे मनस्वी 99.76 पर्सेंटाइल, सस्ते पियुष 99.75 पर्सेंटाइल, आशिष जहांगीरदार 99.72, तोतला श्रेष्ठ 99.69, नवले अनुज 99.53, नलावडे सायली 99.45, पाटील समृद्धी 99.37, धैर्य चौधरी 99.36, दाते अभेद्य 99.29, कापडी अथर्व 99.27, साखरे पृथ्वीराज 99.24, खोत मानसी 99.23, कदम नीलभ 99.8, तोतला मयंक 99.7, कदम अजिंक्य 99.7, अडसुळे हर्षल 99.3, केसवानी प्रांजल 98.96, पाटील ईश्वरी 98.96, घाटुळे संकेत 98.91, गंगारडे श्रेया 98.85, पाटील अनन्या 98.84, गडदे अथर्व 98.79, भुइंगडे सोमनाथ 98.77, शिंदे प्रणव 98.73, काबरा जान्हवी 98.65, कदम सुशांत 98.63, लाड योगेश्वरी 98.61, शिंदे अनिकेत 98.56, तेलसिंगे पूर्वा 98.54, गडदे वेदांत 98.54, चव्हाण आर्या 98.54, दानवाडे मुशरत 98.52, पाटील सौमित्र 98.47, कोळके रजत 98.35, रेपे अथर्व 98.31, पाटील विरेन 98.26, कुंभार विवेक 98.18, पवार वेदांत 98.16, कबाडे आदित्य 98.13, ढेंबरे मयुरेश 98.10, पाटील आदित्य 98.10, बाहेती रोनक 98.10 या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले.  या निकालात 99 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे 19 विद्यार्थी व 90 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे तब्बल 158 विद्यार्थी आहेत. 

    या सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्रद्धा इन्स्टिट्यूटने आयोजित केला होता. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रथम महापौर मा.श्री उदय धातुंडेसो व प्रथम उपमहापौर मा.श्री. अनिलकुमार डाळ्यासो उपस्थित होते.  प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये श्री.उदय धातुंडे साहेबांनी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा व सामाजिक कानमंत्र दिला. ते म्हणाले मुलांनो भविष्यात आपण कितीही मोठ्या पदावर विराजमान झालात तरी त्या पदाचा उपयोग आपण नेहमी गोरगरिबांच्या कल्याणासाठीच केला पाहिजे. श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवून भविष्यात कार्य करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे.  श्रद्धा इन्स्टिट्यूट निकालामध्ये अग्रेसर आहेच पण यापुढे लागणारे सर्व निकाल हे अभूतपूर्व व रेकॉर्ड ब्रेक करणारे असतील आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी श्री. ए. आर.  तांबे सर मलाच बोलावतील असे मी विश्वासाने सांगतो. 

   उपमहापौर मा.श्री अनिलकुमार डाळ्या  यांनी आपल्या मनोगतामध्ये इचलकरंजी शहरासाठी श्रद्धा इन्स्टिट्यूट किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करताना ते म्हणाले शहराच्या आर्थिक जडणघडणीमध्ये व इचलकरंजी शहर शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येण्यामध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूटचा खूप मोठा वाटा आहे.  विद्यार्थ्यांसाठी श्रद्धा इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट ठरली आहे.  शिस्त, ज्ञान, मेहनत यामुळे श्रद्धा मध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतोच.  श्री तांबे सर भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांची उज्वल भवितव्य घडवत राहतील यात तीळमात्र शंका नाही. याप्रसंगी उपस्थित पालक व अन्य प्रमुख पाहुण्यांनी इन्स्टिट्यूटचे निकाल व कामकाजा संदर्भात समाधान व्यक्त केले.

     यशाची उंची गाठत असताना योग्य नियोजन आणि अपार कष्टाची जोड लागते आणि ते कष्ट आणि नियोजन योग्य मार्गदर्शनाखाली झाले की, असे असामान्य निकालात त्याचे परिवर्तन होते. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट भविष्यात याच्या पेक्षाही मोठे निकाल देत व अनेक रेकॉर्ड क्रॉस करीत नवीन बेंचमार्क निर्माण करेल असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री.ए आर.तांबे सर यांनी व्यक्त केले.

    या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.ए.आर तांबे सर, श्री. एम. एस. पाटील सर, समन्वयक सौ.संगीता पवार,  सौ.सुप्रिया कौंदाडे, श्री.अभिषेक तांबे, सौ.सृष्टी तांबे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.