श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट बदलली; आता ऑगस्टमध्ये नाही, ‘या’ दिवशी होणार सिनेमागृहात दाखल
मुंबई प्रतिनिधी - श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या बहुप्रतीक्षित सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रद्धा कपूरला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘ईठा’ हा सिनेमा यापूर्वी 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असून 4 डिसेंबर 2026 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या पोस्टसोबत, “तुफान के लिए तैयार रहना, क्योंकि ईठा आ रही हैं... 4 दिसंबर को” असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. रिलीज डेट बदलल्याची माहिती समोर येताच चाहत्यांकडून या पोस्टवर प्रतिक्रिया आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.विठाबाई नारायणगावकरांच्या आयुष्याची कहाणी पडद्यावर ‘ईठा’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासातील महत्त्वाचं नाव असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. लावणी आणि लोककलेला नवी ओळख मिळवून देणाऱ्या विठाबाईंचा संघर्ष, त्यांचा प्रवास आणि कलेप्रती असलेली निष्ठा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.
या सिनेमात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत आहे. सिनेमातील श्रद्धाच्या लूकची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. टीझरमधील तिच्या अभिनयाचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.
श्रद्धा कपूरसोबत दिसणार दिग्गज कलाकार
‘ईठा’मध्ये श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, नाना पाटेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या स्टारकास्टकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे सिनेमात अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे.
प्रदर्शनाच्या तारखेत बदल का?
गेल्या काही दिवसांपासून ‘ईठा’च्या रिलीज डेटमध्ये बदल होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर निर्मात्यांनी अधिकृत पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती; मात्र आता हा सिनेमा 4 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, ‘ईठा’च्या प्रदर्शनाच्या नव्या तारखेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनप्रवास श्रद्धा कपूर आपल्या अभिनयातून कितपत प्रभावीपणे साकारते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.




