1 आणि 2 एप्रिलला संपर्कप्रमुखांची विशेष बैठक;उद्धव ठाकरेंकडून पुन्हा मोर्चेबांधणी

1 आणि 2 एप्रिलला संपर्कप्रमुखांची विशेष बैठक;उद्धव ठाकरेंकडून पुन्हा मोर्चेबांधणी

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे  एक एप्रिल आणि दोन एप्रिल रोजी राज्यभराचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच 1 आणी 2 एप्रिलला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवली आहे. त्यात 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त मुंबईतील नगरसेवकांवर ठाकरेंच्या सेनेकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पक्षाकडून संपूर्ण राज्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबईतील नगरसेवकांवर निरीक्षण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबईसह पहिल्या टर्ममधील खालील नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा - धर्मेंद्र काळे,नाशिक - सुहास वाडकर,नागपूर - किरण तावडे,वर्धा - सचिन पडवळ,सचिन पाटील - पालघर,निशिकांत शिंदे - चंद्रपूर,तुळशीराम शिंदे - धुळे,जितेंद्र वळवी - नंदुरबार,प्रमोद सावंत - जळगाव,सदा परब, चंगेज मुलतानी - अहिल्यानगर,चिंतामणी निवाटे - जालना,दीपक सावंत - हिंगोली,विश्वास शिंदे - बीड,सुनील मोरे - नांदेड,रमाकांत रहाटे - अमरावती,अनिल कदम - अकोला,हरी शास्त्री - वाशीम,जोसेफ कोळी - बुलढाणा,राज मुल्ला - भंडारा,शशिकांत झोरे - गोंदिया,विजय भनगे - यवतमाळ,विठ्ठल लोकरे - गडचिरोली,अंकित प्रभू - रायगड,गीतेश राऊत - रत्नागिरी,सुरेश पाटील - सिंधुदुर्ग,सोमनाथ सांगळे - पुणे,सत्यवान उभे - सातारा,स्वप्नील कुंजीर - सांगली,कैलास पाठक - सोलापूर,उदय दळवी - कोल्हापूर,आशिष चेंबूरकर - छत्रपती संभाजीनगर,राजू पाटील - परभणी,सुनील पाटील - धाराशिव,मुकेश साळुंके - लातूर