3 किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! BigBasket, Zepto अन् Blinkit सह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा
मुंबई (प्रतिनिधी) : वाढत्या साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. साखरेचे दर अचानक वाढल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.दरम्यान, वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांनी साखर खरेदीवर मर्यादा घातली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांना ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साखरेचा पुरवठा करता येणार नाही.

झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टवर विकल्या जाणाऱ्या साखरेच्या पाकिटांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. काही ब्रँड्सनी दोन किलोपेक्षा जास्त, तर काही ब्रँड्सनी तीन किलोपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांवर साखर विक्रीसाठी मर्यादा असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ई-कॉमर्स कंपन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. ब्रँडनुसार ही मर्यादा 2 ते 3 किलोपर्यंत बदलत आहे. झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टनेही साखर खरेदीवर मर्यादा निश्चित केली आहे.
सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक क्विक कॉमर्स ॲप्स आणि मोठ्या दुकानांमध्ये एका वेळी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त साखर खरेदी करता येत नाही. लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा करू नये आणि इतर ग्राहकांनाही साखर उपलब्ध व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, स्विगी इन्स्टामार्टवर काही ब्रँडच्या साखरेच्या दोन पाकिटांची किंवा दोन किलोपर्यंतची ऑर्डर मर्यादित आहे. तर ब्लिंकइटवर काही पॅक दोन किलोपेक्षा जास्त घेण्याची परवानगी नाही.ब्लिंकइटवर एका ब्रँडच्या फक्त एका 3 किलोच्या पॅकला परवानगी आहे. तर झेप्टोवर एका ब्रँडच्या फक्त एका 2 किलोच्या पॅकला परवानगी असल्याची माहिती आहे.मात्र, ही मर्यादा सर्वत्र सारखी नाही. ती ॲप, प्रदेश, ब्रँड आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलत असल्याचं समोर आलं आहे.
झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टने काही साखर उत्पादनांच्या पॅकच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. तर दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये बिगबास्केट काही ब्रँड्सच्या सहा पाकिटांपर्यंत खरेदीची परवानगी देत आहे.त्यामुळे ही मर्यादा देशभर लागू करण्यात आलेला सरकारी निर्बंध नसून, वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सनी आणि ब्रँड्सनी स्टॉक व मागणीनुसार घातलेली मर्यादा असल्याचं समोर आलं आहे.




