कोगे कुमार / कन्या विद्यामंदिर आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विश्वासराव दतात्रय पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्याचे वाटप
करवीर (प्रतिनिधी) : कोगे तालुका करवीर येथील व कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रे माजी व्हा. चेअरमन व संचालक विश्वासराव दत्तात्रय पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त कन्या व कुमार विद्या मंदिर कोगे शाळेच्या 375 ते 400 विद्यार्थ्यांना टी-शर्ट किट वाटप करण्यात आले, तसेच अंगणवाडी न्यू इंग्लिश स्कूल कोगे, शालेय वस्तू, भेट स्वरूपात वाटप करण्यात आले . उमेद फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना दोनशे किलो धान्य,मिठाई, रोख रक्कम स्वरूपात रुपये 5000 देण्यात आले .

तसेच कुमार व कन्या शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाफळे मामा हे होते .यावेळी व्ही डी. पाटील, सचिन विश्वासराव पाटील , शालेय समिती अध्यक्ष संजय मोरे, संजय पाटील आदी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी बोलताना विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकात शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, आरोग्याची काळजी, आणि शिक्षणासाठी काही अडचणी आल्या तर, मला कधीही तुमची एक हाक द्या मी तिथे उपस्थिती राहून मी ती पूर्ण तत्वास नेईन अशी ग्वाही दिली.
यावेळी कार्यक्रमासाठी कुंभी संचालक उत्तमराव वरुटे (कसबा बीड), संजय पाटील (खुपिरे), अनिल पाटील, तानाजी पाटील (साबळेवाडी), दादासो लाड( गणेशवाडी ), कुंभी बँक संचालक रणजीत पाटील,यशवंत बँकेचे संचालक महेश पाटील (पाडळी), सरपंच वंदना इंगवले, उपसरपंच कृष्णात फडतारे, सखाराम पाटील, दत्ता मांगोरे,महालक्ष्मी पशुखाद्याचे मॅनेजर डॉ. व्हि डी पाटील, विकास पाटील, कन्या शाळा व्यवस्थापन अध्यक्ष टी एन पाटील, संजय मोरे, मुख्याध्यापक बोटे, शिवाजी बागडे सर, एकनाथ चौगुले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत एकशिंगे सर प्रास्ताविक शिवाजी बागडी सर व आभार म्हेतर सर यांनी केले .




