अभिनेते धर्मेंद्र यांची 'ही' शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
मुंबई - बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी, ८९ व्या वर्षी, दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देऊन घरीच उपचार सुरू ठेवले होते. त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही. दरम्यान, धर्मेंद्र यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट आता जोरदार व्हायरल झाली आहे.

निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी आपला आगामी चित्रपट 'इक्कीस' चा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्ती नंदा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
https://www.instagram.com/reel/DQZCD4FjJai/?utm_source=ig_web_copy_link
धर्मेंद्र यांनी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पोस्ट करताना लिहिले होते की, "वो इक्कीस का था, इक्कीस का ही रहेगा!" 'इक्कीस' हा भारताच्या सर्वात तरुण परमवीर चक्र पुरस्कार विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या शौर्यकथेतून प्रेरित चित्रपट आहे. हा श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स व दिनेश विजन निर्मित चित्रपट आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते की, आपला #QissaAtIkkis शेअर करा, कारण प्रत्येक कथा तरुण वयापासून सुरू होते. त्यांनी ख्रिसमस २०२५ ला या चित्रपटाचा प्रेक्षकांसमोर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल, याची माहिती देखील दिली होती.




