उल्लेखनीय कार्याबद्दल पार्थ पाटीलचा गोखले कॉलेजमध्ये सत्कार

उल्लेखनीय कार्याबद्दल पार्थ पाटीलचा गोखले कॉलेजमध्ये सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई व पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पार्थ विद्यानंद पाटील याचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

पार्थ विद्यानंद पाटील याने बी. इ सिव्हिलचे शिक्षण डॉ.डी. वाय. पाटील इंजिनियरिंग कॉलेज या ठिकाणी केले. मास्टर ऑफ स्ट्रॅक्चर चे शिक्षण लंडन मधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटी येथे पूर्ण केले असून त्यांनी थ्री डी प्रिंटिंग स्लॅब कव्हर्स या विषयातील भारत सरकारचे पेटंट त्यांना मिळाले असून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.जयकुमार देसाई व युवा नेते दौलत देसाई यांनी विशेष कौतुक करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी विश्वजीत विद्यानंद पाटील उपस्थित होते.