एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ;अधिवेशनात मोठी घोषणा
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांच्या महागाई भत्त्यात थेट 5 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होणार असून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
याशिवाय घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 8, 16 आणि 24 टक्के असलेला घरभाडे भत्ता आता अनुक्रमे 10, 20 आणि 30 टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीच्या दरातही सुधारणा करण्यात आली असून ती 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आली आहे.. या निर्णयाचे कर्मचारी संघटनांसह विविध स्तरांतून स्वागत होत आहे.




