कोजिमाशीच्या अध्यक्षपदी अविनाश चौगुले बिनविरोध

कोजिमाशीच्या अध्यक्षपदी अविनाश चौगुले बिनविरोध

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश महादेव चौगुले (शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ता. कागल) यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अध्यक्ष स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील उपस्थित होते या निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कोरडे यांनी केले.

अध्यक्ष पदासाठी अविनाश चौगुले यांचे नाव संचालक जितेंद्र म्हैशाळे यांनी सुचविले तर श्रीकांत पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी उपाध्यक्ष ऋतुजा पाटील, संचालक बाळ डेळेकर, दीपक पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, दत्तात्रेय घोगरे, राजेंद्र रानमाळे, अनिल चव्हाण, मदन निकम, उत्तम पाटील, शरद तावदारे, श्रीकांत कदम, पांडुरंग हळदकर, प्रकाश कोकाटे, सुभाष खामकर, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, शितल हिरेमठ, एकनाथ आरडे आदींसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे उपस्थित होते. सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा व आदर्शवत पारदर्शी कारभार केला जाईल अशी ग्वाही अध्यक्ष चौगुले यांनी दिली.