कोल्हापूर मनपात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर मनपात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर  रुपाराणी निकम यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.

या प्रसंगी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महापालिकेच्या वतीने 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक' (POSH) कायद्यांतर्गत उपस्थितांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्माननीय आणि आदरयुक्त वातावरण निर्माण करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी महापौर निकम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पेनचा बॉक्स भेट दिला, तर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जिलेबी व खाऊचे वाटप केले.

आपल्या संदेशात महापौर निकम म्हणाल्या, "अनेक जवानांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या सहकार्यामुळेच शहर विकास शक्य आहे. संपूर्ण देशात कोल्हापूरचे नाव आदराने घेतले जाईल, अशा तऱ्हेने सर्व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना गतीने व उत्तम सेवा द्यावी."

यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, कामगार अधिकारी राम काटकर, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थी -विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.