खानदेशी पुरणपोळीच्या चवीने खासदार श्रीकांत शिंदे भारावले; नंदुरबारमध्ये घेतला आस्वाद
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खानदेशातील प्रसिद्ध पुरणपोळीचा आस्वाद घेतला.पुरणपोळी नेमकी कशी तयार केली जाते, याची संपूर्ण माहिती त्यांनी स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली.नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पुरणपोळी तयार केली जाते.याच ठिकाणी भेट देत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला.

खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला विशेष महत्त्व असल्याने, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही.शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खानदेशातील प्रसिद्ध पुरणपोळीचा आस्वाद घेत स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला.नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातपुरणपोळी तयार केली जाते. याच ठिकाणी भेट देत त्यांनी पुरणपोळी बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली.
यावेळी डॉ. शिंदे यांनी पुरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कणिक मळण्याची पद्धत, पोळी लाटण्याची प्रक्रिया तसेच पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी भाजण्याचे बारकावे समजून घेतले.खानदेशातील पुरणपोळी तिच्या खास चवीमुळे आणि पारंपरिक पद्धतीमुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. सण-उत्सवांसह विविध विशेष प्रसंगी या पदार्थाला मोठी मागणी असते.
खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला असलेले विशेष स्थान पाहता, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही. त्यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेत स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक केले.




