गोकुळ निवडणुकीसाठी शाहू समविचारी आघाडी मंगळवारी ठराव दाखल करणार
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून जिल्ह्यातील सभासद संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मंगळवारी सकाळी १०.०० वाजता मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहेत. ठरावधारक धैर्यप्रसाद हॉल येथे एकत्र जमून सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालय येथे जाऊन ठराव देणार आहेत.

यावेळी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, शिवसेना उपनेते संजय पवार,शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, गणपतराव पाटील, गोपाळराव पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, अंजनाताई रेडेकर,अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील,बयाजी शेळके,राहुल देसाई,सत्यजित जाधव,पी. डी. धुंदरे,हिंदुराव चौगले,सदाशिव चरापले,जीवन पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर,जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील,राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील,गगनबावडा पंचायत समिती सभापती छाया देसाई यांच्यासह ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.




