डीकेटीई (DKTE) इंजिनिअरिंग आणि एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी : इंजिनिअरिंग आणि एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी! इचलकरंजी येथील नामांकित डीकेटीई (DKTE) संस्थेमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया २ जुलै २०२६ पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

'डीकेटीई' हे अभियांत्रिकी व एमबीए प्रवेशाचे अधिकृत 'स्कृटनी सेंटर' (Scrutiny Center) आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कॉलेजच्या भव्य सेंट्रल लायब्ररीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तज्ञ प्राध्यापकांचे मोफत मार्गदर्शन दिले जात आहे. पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा उत्साहात लाभ घेतला.
ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत १२ जुलै २०२६ पर्यंत आहे. तर ३ ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. यानंतर १५ जुलै रोजी तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर होईल. १६ ते १८ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवता येतील आणि २० जुलै २०२६ रोजी अंतिम (फायनल) मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल.




