देसाई - मोरे व मोहिते विवाह सोहळा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई यांचे नातू व चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी अजितराव मोरे व माजी परिवहन समिती सभापती कोल्हापूर महानगरपालिका अजित जयसिंगराव मोरे यांचे चिरंजीव पृथ्वी आणि अजितसिंह जयवंतराव मोहिते संचालक, शेतकरी संघ कोल्हापूर यांची सुकन्या ऋतुजा यांचा शुभविवाह सोहळा महासैनिक दरबार हॉल प्रांगणातील शाही मंडपामध्ये संपन्न झाला.

वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, खा. धैर्यशील माने, माजी खा. निवेदिता माने,माजी खा. संजय मंडलिक , माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजुबाबा आवळे, सुजित मिणचेकर, उद्योगपती रामदास काकडे, व्ही बी.पाटील, राजेश लाटकर, राहुल पाटील, गुलाबराव पोळ, आर. के. पोवार , ॲड.अनिकेत निकम, चेतन नरके, विश्वास नारायण पाटील, भैया माने, युवराज पाटील,कुलगुरू डॉ. डी .टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील , कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विजय देवणे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, दादा लाड, आदिल फरास,तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते दौलत देसाई, अजितराव मोरे, वर्धन देसाई, प्रणव देसाई, वीरेंद्र देसाई , वीरसेन मोहिते , अजितसिंह मोहिते, सुजितसिंह, सुरज मोरे, कमलाकर मोरे यांनी मान्यवर पाहुण्याचे स्वागत केले.
या विवाह सोहळ्यास पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी -माजी नगरसेवक ,तरुण मंडळाचे कार्यकर्ते, अबालवृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




