पंतप्रधानांपासून शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!"; संजय राऊतांची मागणी
मुंबई : NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर ३६ दिवस चाललेल्या तरुण आंदोलकांच्या आंदोलनापुढे अखेर मोदी सरकारला झुकावे लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य 'तिरंगा रॅली' आणि विजयोत्सव साजरा केला जात आहे."

"या विजयोत्सवाआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करत शिक्षणमंत्र्यांसह पंतप्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी केली आहे."
"३६ दिवसांच्या संघर्षानंतर मोदी सरकारला युवा शक्तीच्या मागण्यांसमोर झुकावे लागले. सरकारने जनतेसमोर कायम नम्रता ठेवली पाहिजे, पण भाजपने त्यांच्या शब्दकोशातून नम्रता शब्दच काढून टाकला आहे. जेव्हा मोदींसारख्या लोकांना झुकवले जाते, तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो."
"आनंदोत्सव साजरा करताना संयम बाळगण्याचे आवाहन राऊतांनी केले. नीट पेपरफुटीमुळे तब्बल २१ विद्यार्थ्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले, तर आंदोलनादरम्यान अनेक तरुणांनी पोलिसांच्या लाठ्या आणि गोळ्या झेलल्या, काही जणांची दृष्टी गेली, हे विसरता येणार नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली."
"आदित्य ठाकरेंनी मांडलेली भूमिका अतिशय योग्य आहे. पेपरफुटीमुळे २१ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे देशामध्ये कायद्याचे राज्य असेल तर पंतप्रधानांपासून ते केंद्रीय शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे!"




