पुढील ३ दिवस धुवांधार बरसणार, ६ जुलैनंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

पुढील ३ दिवस धुवांधार बरसणार, ६ जुलैनंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई: राज्यात मान्सूनचे वारे पूर्णपणे सक्रिय झाले असून मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) इशारा देण्यात आला आहे. शनिवार, जुलै रोजी मुंबईसह ठाणे, पालघर आणि पुण्याच्या घाटमाथ्याला हवामान विभागाने (IMD) 'रेड अलर्ट' जारी केला आहे. आगामी ७२ तासांत मुंबईतील काही भागांत २४ तासांत तब्बल २०० मिमीपर्यंत पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज आहे.

जुलैनंतर हवामान बदलणार: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. मात्र, ही परिस्थिती केवळ पुढील ते दिवस राहील. जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (IMD) अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. सध्या राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

कुठे कोणता अलर्ट?

·         रेड अलर्ट (शनिवार, जुलै): मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा आणि पुण्याचा घाटमाथा. या भागात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

·         ऑरेंज अलर्ट: कोकण किनारपट्टीच्या उर्वरित भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार: मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. पहाटेपासूनच जोरदार सरी कोसळत असून आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. शनिवारसाठी 'रेड अलर्ट' असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे, तसेच सखल भाग आणि समुद्रकिनाऱ्यालगत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

·         'रेड अलर्ट':
शनिवार, जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि सातारा-पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा ('Very Likely' Red Alert).

·         २०० मिमी पावसाची शक्यता:
 मुंबईत २४ तासांत काही ठिकाणी २०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता.

·         जुलैपासून दिलासा:
मान्सून सध्या सक्रिय असला तरी जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याची IMD चे अधिकारी एस.डी. सानप यांची माहिती.

·         प्रशासनाचे आवाहन:
हवामान बिघडलेले असल्याने समुद्रकिनारे, झाडांचा परिसर आणि पाण्याचे प्रवाह यांपासून लांब राहावे आणि काळजी घ्यावी.